Breaking News

तहसील कार्यालयात बहुजन क्रांतीचे धरणे आंदोलनपाथर्डी/प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना दावणीवर चारा पाणी शिधा पत्रिकेतील संगणकीय दोषामुळे धान्य वाटपात अन्याय करू नये निराधाराना पेन्शन मिळावी या प्रमुख मागण्ंयासाठी बहुजन क्रांती पक्षाच्यावतीने पक्षाचे अध्यक्ष सतीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतात राबणार्‍या बहुजन समाजाला उध्वस्त करून हा देश कधीच महासत्ता होणार नाही, सात पदरी हायवे, बुलेट ट्रेन, मेट्रो, विमानतळ हे कामे थांबवून शेतकर्‍यांच्या शेती हिरवीगार होण्यासाठी तसेच शेतकर्‍यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी शेती मालाला योग्य भाव द्या.

 सातवा वेतन आयोग थांबवा आणि गोरगरीब, निराधार, अपंग यांच्यासाठी असणार्‍या विविध योजनांचे रखडलेले अनुदान अदा करा दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍याच्या दावणीला चारा देवून अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनाला मोठे जन आंदोलन करू असे बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष सतीश पालवे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी वजीर शेख, शशिकांत नवगिरे, सुधाकर शेरक, सागर गावडे, गणेश गोरे, भगवान घुगे, संभाजी पालवे, सुधाकर कारखेले, इम्रान पठाण, संदीप सातपुते, विकास पालवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नायब तहसिलदार पंकज नेवसे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलकांच्या मागण्या जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येवून पुढील निर्णय घेण्यात येतील. असे आश्‍वासन देण्यात आल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.