Breaking News

पाच वर्षांत झिक्री आदर्श गा्रम करणार-आजबे; स्वखर्चातून हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार


जामखेड ता/प्रतिनिधी
लोकसहभागातून गावातील रस्ते, वीज व पाण्याची मुलभूत समस्या सोडवून नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील झिक्री हे गाव पाच वर्षांत एक आदर्श निर्माण करणार आहोत. असा विश्‍वास सावळेश्‍वर उद्योग समूहाचे अध्यक्ष रमेश आजबे यांनी हनुमान मंदिराचा स्वखर्चातून जिर्णोद्धार करून आज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच झिक्री गाव दत्तक घेतल्याने यावेळी आजबे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आजबे बोलत होते.

यावेळी काका चव्हाण, दादासाहेब ढवळे, भाऊसाहेब इथापे, लक्ष्मण ढेपे, अनिल यादव, अंकुश डोंगरे, सुग्रीव सांगळे, नितीन सपकाळ, दादासाहेब घोलप, सचिन खैरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, जनार्दन कसाब, ऋषिकेश सांळूके, विजय धुमाळ, घनश्याम आडाले, बाळासाहेब इथापे, दत्तात्रय साळुंके, सचिन साळुंके, घनश्याम कसाब, चंद्रकांत कसाब, योगेश इथापे, बाळासाहेब इथापे, शांतीलाल इथापे, अशपाक शेख, सुभाष पवार, रमेश इकडे, रंजीत साळुंके, नवनाथ साळुंके व आदी उपस्थित होते.

शाळेतील मुलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न पदरमोड करून कुपनलिका घेऊन व मोटार टाकून सोडविला. लवकरच शाळेसाठी सरंक्षक भींत बांधून अंगणवाडी व शाळा परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविले जातील. गावाच्या विकासासाठी गाव दत्तक घेऊन सर्वागीण विकासासाठी प्रयत्न केला आहे. पाणंद रस्ते, शिव रस्ते, वाडीवस्तीवर वीजेची सोय, पिण्याच्या पाण्यासाठी काझेवाडी तलावातून पाईपलाईन करूण गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविला जाईल. हे सर्व लोकसहभागातून व मी पदरमोड करून करणार आहे. तसेच गावातील वाद गावातच मिटवले जातील. यासाठी लोकांचे मनपरिवर्तन केले जाईल. पाच वर्षांत एक आदर्श गाव निर्माण केले जाईल. असे आजबे यांनी सांगितले.