Breaking News

...अखेर वाघोलीत मिनी बस स्टॉप


वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली,ता.कोरेगाव. येथे वाघोली-सोनके,वाई-वाठार या चौकातव वाघोली गावामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी नवीनमिनी बसस्थानक बांधनेत आले. यापूर्वी या चौकात बस स्थानकाची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने तपत्या उन्हामध्ये व पावसामध्ये प्रवाशांना गाडीची वाट पाहत तसेच उभे रहावे लागत होते.

मिनी बस्थानक बांधल्याने आता प्रवाशांचे उन आणि पावसापासून संरक्षण होऊन बस स्थानकामध्ये बसण्याची सोय असल्याने उभे राहून गाडीची वाटपाहू लागत नाही.

संबंधित बस्थानक हे खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून व वाघोली गावचे सरपंच बशीरखान पठाण यांच्या चालू कारकिर्दीत बंधानेत आले असून सध्या चांगल्या स्वरूपात प्रवाशांची सोय झाल्यानेत्यांच्या या कार्याने ग्रामस्थ व प्रवासी मा. सरपंच यांचे आभार मानत आहेत. आपल्या कारकिर्दीत अशाच रीतीने गाव प्रगती पथावर नेहन्यासाठी भाव व्यक्त करून शुभेच्छा देत आहेत.