दोन दिवसात कराड ते शिर्डी सायकल प्रवास; कराडमधील युवकांचा नववर्ष प्रारंभानिमित्त अनोखा उपक्रम


कराड (प्रतिनिधी) : सायकलवरून सफर करण्याची हौस असणार्‍या कराडमधील माधव माने, सतीश पाटील, प्रभुदास पटेल, सुभाष बामणे, सुनील पाटील व दिव्यांग माजी सैनिक शशिकांत कुंभार यांनी नववर्षानिमित्त कराड ते शिर्डी असा प्रवास करून श्रीसाईबाबांचे दर्शन घेतले. 


कराड ते पुणे हा 180 किलोमीटर आणि पुणे ते अहमदनगर 120 किलोमीटर व अहमदनगर ते शिर्डी 90 किलोमीटर असा एकूण 390 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून अवघ्या दोन दिवसात पूर्ण केला. लष्करात कार्यरत असताना शशिकांत कुंभार यांचा एक पाय सैन्यदलातील सेवेदरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये भू-सुरूंगाच्या स्फोटात गेला आहे. त्यांनी यापूर्वी अनेकदा महाराष्ट्रात विविध भागात सायकलप्रवास केला आहे. तसेच ते नियमित पोहणे, गड चढणे असा व्यायाम करीत असतात. प्रवासादरम्यान, पुणे जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. श्री. क्षीरसागर व देवजीभाई पटेल, अहमदनगर येथे अंकुर पटेल व शिर्डी येथे विभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांचे सहकार्य लाभले. कराडमधील युवकांनी नववर्ष प्रारंभानिमित्त राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले. 


Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget