कराडमध्ये पतंग महोत्सवास मोठा प्रतिसाद


कराड (प्रतिनिधी) : विजय दिवस समारोह समितीच्यावतीने संक्रातीचेनिमित्त साधून निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच 16 व्या पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर घेण्यात आलेल्या या महोत्सवास कोल्हापुरचे उदघाटन बाबा महाडीक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विजय दिवस समारोह समितीचे पदाधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. त्यास पतंगप्रेमींनी मोठी उपस्थिती लावली होती. या महोत्सवात पतंग उडवण्याची स्पर्धाही घेण्यात आली. प्रत्येक स्पर्धकास पतंग आणि मांजाही पुरवण्यात आला होता. अ‍ॅड. परवेझ सुतार, सौ. रुपाली जाधव, सौ. स्नेहा तोडकर यांनी परिक्षक म्हणुन काम पाहिले. निवृत्त प्राचार्य जी. आर. कणसे यांनी सूत्रसंचालन केले. 

लहान गटात अभिषेक सुकरे, सचिन कोळी, युवराज जाधव यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. उतेजनार्थ म्हणुन रोहन भोसले, आकाश साठे व श्रेया कदम यांना गौरवण्यात आले. मोठ्या गटात सौरभ मसुरकर, लाला बागवान, अजय शिंदे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. उत्तेजनार्थ म्हणुन करण चांदणे, उबेर बागवान, सईद मुजावर यांना बाबा महाडीक, अरुण जाधव, ज्येेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजय दिवस समितीचे चंद्रकांत जाधव, प्रा. रजनीश पिसे, रमेश जाधव, रमेश पवार, सागर जाधव, सहसचिव विलास जाधव यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर एन्व्हायरो क्लबच्यावतीने स्टेडीयमचा परिसर स्वच्छ करण्यात आला. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget