फलटणला रंजना कुंभार नगरसेवकपदी बिनविरोधफलटण(प्रतिनिधी) : फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 ची पोटनिवडणूक काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बिनविरोध झाली. त्यानुसार नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती रंजना जगन्नाथ कुंभार यांना बिनविरोध संधी मिळाली आहे.

फलटण पालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार यांच्या अपघाती मृत्यूमुळे तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. हा मतदारसंघ ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असून राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत जगन्नाथ कुंभार यांच्या पत्नी श्रीमती रंजना कुंभार यांना उमेदवारी दिली होती.

त्यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे राजेश शिंदे यांनी अर्ज भरला होता, मात्र काल अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंजना कुंभार या बिनविरोध निवडून आल्या. दिवंगत जगन्नाथ कुंभार यांना श्रद्धांजली म्हणून प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिंदूराव नाईक निंबाळकर, युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते समशेर नाईक-निंबाळकर यांच्या सूचनेनुसार निवडणुकीतून माघार घेतली असल्याचेकाँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले. यापूर्वी भाजपनेही या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम यांनी स्पष्ट केले होते. या निवडीबद्दल राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी करून श्रीमती कुंभार यांचे अभिनंदन केले. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी त्यांना सहकार्य केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget