Breaking News

राज्यस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेला प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी -
जिल्हा रोलर स्केटिंग असो. व टीम एम स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी आयोजित दुसरी खुली राज्यस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धा नगरमध्ये उत्साहात पार पडली. स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलच्या ट्रॅकवर या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 325 खेळाडू सहभागी झाले होते. 

यावेळी स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे राज्य उपाध्यक्ष सचिन अमीन (अकोला), सहसचिव अजय भाटकर (औरंगाबाद), स्पर्धेचे समन्वयक मनोज करपे, सदस्य श्याम भोकरे, कुंदन नायडू, अमर लोंढे, मोरेश्वर कदम, विशाल मोरे, आदित्य दणदणे, सुप्रिया अमीन, रुचा थोरात, टिम ऐम स्पोर्टस अ‍ॅकॅडमीचे सचिव प्रमोद डोंगरे उपस्थित होते.

दोनदिवसीय स्पर्धेत विविध वयोगटांत कॉड स्केट्स व इनलाईन स्केट्स या प्रकार घेण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे संचालक बाळासाहेब खोमणे व जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव आसिफ बाबुलाल शेख यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव, जालना, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नाशिकसह नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.