Breaking News

कुरणेश्‍वर मॉर्निंग वॉक गु्रपतर्फे नववर्षदिनी वृक्षारोपण


सातारा (प्रतिनिधी) : पर्यावरण संतुलनाचा कायमच ध्यास धरणार्‍या कुरणेश्‍वर मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे नववर्षदिनी वृक्षारोपणाद्वारे अनोख्या पदध्तीने नववर्षाचा प्रारंभ करण्यात आला. नववर्षाच्या प्रारंभी कुरणेश्‍वर मंदिरालगतच्या बागेसह बोगदा ते (कै.) अभयसिंहराजे भोसले पथ परिसरात वृक्ष लागवड करून नववर्षारंभदिनापासून कोणत्याही प्रकारचे व्यसन न करण्याचा संकल्प ग्रुपच्या सदस्यांनी जाहीर केला. 


डॉ. सतीश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व सी. पी.भोसले यांच्या हस्ते बागेतील बाकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रशांत कुलकर्णी, सौ. शुभांगी कुलकर्णी, अनिरुद्ध वीर, अशोक यादव, विजयकुमार भद्रे, शंकर सकट, अभय देशमुख, सार्थक खंडूझोडे, अ‍ॅड. सपकाळ, दीपक दीक्षित, राबिन कदम, शिवाजी क्षीरसागर, डॉ. सतीश भोसले, अनिल वीर आदी विविध स्तरातील मान्यवर सदस्य उपस्थित होते.