Breaking News

स्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे


आमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान

कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून राहूल गांधी का नरेंद्र मोदी असा सवाल जनतेसमोर येईल. तेव्हा भाजपने स्वतंत्र निवडणूक लढली तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार, हे निश्‍चित असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. गोटे (ता. कराड) येथील महिंद्रा हाँटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

या वेळी पक्षाच्या प्रभारी नीता केळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत पाटील, मनोज घोरपडे, एकनाथ बांगडी, डाँ. दिलीप येळगांवकर, अनिल देसाई यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, भाजप विकासकामाच्या जोरावर निवडणुक लढवणार आहे. मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील. जेथे आमचे काम वाढले असेल तेथे आमचा उमेदवार असेल. शिवसेना - भाजप एकत्र लढावे, मतविभाजन होवू नये यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न राहील. मात्र तरीही जे येतील त्यांच्यासह, जे नसतील त्यांच्याशिवाय भाजप निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे 48 मतदारसंघात आमची तयारी चालू आहे. जेथे आमचे काम चांगले होईल आणि तेथे युतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा मित्रपक्षालाही होईल. शेवटी त्यांचा आणि आमचा उद्देश एकच आहे, या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत. शिवस्मारकांच्या प्रश्‍न काही तांत्रिक गोष्टीमुळे वेळ लागत आहे. अशोक चव्हाण यांना पुढचे दहा वर्षे टीका करण्यांचे काम आहे. भाजप-शिवसेना अपवादात्मक वगळता गेल्या 30-35 वर्षापासून एकत्र आहे. ही युती इथून पुढे हि अशीच राहील असा आमचा प्रयत्न राहील. शिवसेनेने कोणत्याही प्रकारची टीका न करता चर्चेला बसावे, म्हणजे मतभेद मिटतील. राज्यात जागावाटपावर निर्णय घेण्यात येईल. ज्या जागावर काही तिढा असेल त्यांचा निर्णंय केंद्रातून घेतला जाणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

जालना मतदारसंघ भाजपकडेच

शिवसेनेचे अर्जून खोतकर हे जालना मतदारसंघवर दावा करत आहेत. तेव्हा हा मतदारसंघ शिवसेनेला सोडणार का आतापयर्यंत असं घडल नाही, की आमचा असलेला मतदारसंघ सोडला आहे. तेव्हा हा प्रश्‍नच निर्माण होत नाही.