Breaking News

देश के हम भंडार भरेंगे, लेकिन किमत पुरी लेंगे; भारतीय किसान संघाच्या घोषणेने जिल्हा कचेरी परिसर दणाणला


बीड, (प्रतिनिधी):- शेतीसाठी प्रतिवर्ष हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज भारतीय किसान संघाच्यावतीने देशव्यापी धरणे आंदोलन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा कचेरीसमोर शेतकर्‍यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. देश के हम भंडार भरेगें लेकिन किमत पुरी लेगें अशा घोषणांनी जिल्हाकचेरी परिसर दणाणून गेला होता. 

शेतीसाठी प्रतिवर्ष अनुदानाची मागणी भारतीय संघाने केली आहे. यात शेतीसाठी प्रतिवर्ष हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे, सर्व कृषि निष्ठावंतांना जीएसटी करातून वगळावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. हमीभावाची घोषणा फक्त कागदावरच असुन शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली असुन पदाधिकारी आणि शेतकर्‍यांनी या देशव्यापी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. माफि नको अनुदान पाहिजे, भिक नको सन्मान पाहिजे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.