सामाजिक कार्यकर्त्यांचा चिमुकल्या बालकांसाठी मदतीचा हात; उबदार कपड्यांचे संकलन


कर्जत/प्रतिनिधी
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या क्रांतीयोद्धा फौंडेशनच्यावतीने कर्जत तालुक्यातील शाळा व सामाजिक कार्यात रुची असलेल्या अनेकांना मायेची ऊब या उपक्रमांतर्गत उपेक्षित वंचित असलेल्या चिमुरड्यांसाठी उबदार कपडे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. थंडीत गोठणार्‍या ऊसतोड कामगारांच्या चिमुरड्या मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी स्वेटर, टोपी व उबदार कपडे देण्यासाठी उबदार कपडे जमा करण्यात आले असल्याचे पत्रकार कवी विजय सोनवणे यांनी सांगितले.


कर्जत येथील समर्थ विद्यालय, अमरनाथ विद्यालय, अंबिकानगर येथील वसंतदादा पाटील विद्यालय, जगदंबा विद्यालय, हशू अडवाणी विद्यालय, डायनामिक इंग्लिश स्कूल, चिलवडी येथील नागेश्‍वर विद्यालय, राशीन, गणेशवाडी, करमनवाडी, खेड जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा, खेडचे लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आदी शाळा मदतीसाठी पुढे आल्या. काही शाळांनी आर्थिक मदत करून कपडे घेण्यास हातभार लावला. आत्तापर्यंत सुमारे 600 स्वेटर, 1500 पेक्षा जास्त उबदार कपडे, 150 पेक्षा अधिक साड्या जमा झाल्या आहेत. क्रांतीयोद्धा फौंडेशनच्यावतीने सक्रिय तरुणांनी या ऊसतोड कामगारांच्या तांड्यावर रात्री जाऊन त्यांचे प्रश्‍न समजावून घेतले. मुलांचे शिक्षण, कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या. व्यसनाधीनतेने लयास गेलेल्या अनेक कुटुंबांना जीवन जगण्याचे धडे दिले. माणुसकीसाठी पुढे या, क्रांतीयोद्धाला साथ द्या या हाकेला सत्यात उतरवत युवा व्याख्याते बिभीषणकुमार, विजय सोनवणे, शांतीलाल पोकळे, निकेश जाधव, मुश्ताक शेख, मनीषा पारखे, अजय खराडे, किशोर जाधव, गणेश कारंडे आदींनी शाळा, सामाजिक कार्यकर्ते, घरोघरी जाऊन जुने-नवे उबदार कपडे जमा करण्याचे काम गेली दहा दिवसांपासून हाती घेतले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget