Breaking News

दहावीच्या कल चाचणीला सुरुवात विद्यार्थी मोबाईल अ‍ॅपवरुन देत आहेत कल चाचणीकिनगाव राजा,(प्रतिनिधी): दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणवाटा निवडणे सोपे जावे यासाठी शिक्षण विभाग विभागाकडून 2016 पासून कल चाचणी घेत आहे. यापूर्वी ही चाचणी संगणकावर घेतली जात होती. त्यामुळे ज्या शाळेमध्ये संगणकाची व्यवस्था नव्हती, त्यांना मोठ्या समस्याना तोंड द्यावे लागत होते.

परंतु या वर्षापासून विद्यार्थ्यांची कल चाचणी शिक्षकांच्या मोबाईल अ‍ॅपवर घेतली जात आहे. दहावीच्या परीक्षेपूर्वी ही चाचणी घेऊन निकालाबरोबर त्याचे निष्कर्ष विद्यार्थ्यांना देण्यात येतात. यावर्षी कल चाचणी बरोबर अभियोग्यता चाचणीही घेतली जात आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 सहअभियोगक्षमता चाचणी, ‘महाकरिअर’ मित्र या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून चाचणी राज्यभरातील शाळेत सुरू आहे. 18 डिसेंबर ते 17 जानेवारी दरम्यान ही चाचणी सुरू झाली आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा येथील कामक्षा देवी माध्यमिक विद्यालय येथील शाळेत दहावीच्या कल चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. 140 प्रश्‍नांची ही कल चाचणी आहे.

 या अभियोग क्षमता चाचणीत भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, सांख्यिकी क्षमता, तार्किक या प्रत्येकी 15 प्रश्‍न या चाचणीत विचारले जात आहेत. दोन्ही चाचणीसाठी 90 मिनिटांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. या कल चाचणीबाबत दहावीला अध्यापन करणान्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सिंदखेड राजा तालुक्याचे प्रशिक्षण 14 डिसेंबर रोजी सिंदखेड राजा येथील जिजामाता विद्यालयात तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी बाळाभाऊ मांटे, तज्ञ शिक्षक दीपक नागरे, दसरे आदींनी शिक्षकांना चाचणीबाबत मार्गदर्शन केले. कल चाचणीत विद्यार्थ्यांना स्वत:चे करिअर निवडण्याची संधी देण्यात आली आहे. कल चाचणी प्रकल्प अधिक प्रभावी होण्यासाठी ‘महाकरिअर मित्र’ पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.

कल अहवाल चाचणी मध्ये कृषी, कला, मानवविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा आदी क्षेत्राचे विविध प्रश्‍न दहावीच्या कल चाचणी मध्ये आहे. या कल चाचणीच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक उद्धव दराडे, रामदास सानप, संजय केकान, भुंजगराव झोटे, प्रकाश सोनुने , गजानन मुंढे, नितीन खरात , गजानन थिगळे, राजीव मांटे, संजय काळुसे, उद्धव राठोड, रामेश्‍वर हरकळ आदीजण उपस्थित होते.