नवोपक्रमामध्ये सातारा जिल्हा अव्वल; शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेने राबवलेल्या उपक्रमांचा परिपाक


सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची 98 टक्के उपस्थिती आहे. जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्तेसाठी राबवलेले नवोपक्रम वाखाण्याजोगे आहेत. यामुळेच विद्यार्थ्यार्ची गुणवत्ता वाढली आहे. शालेय पोषण आहार योजनाही प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पथकांनी गुणवत्ता व विविध योजनांची अंमलबजावणी कशी करावी यासाठी सातारा जिल्ह्यात आपली पथके भेटीसाठी पाठवण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिले आहे. 

दरम्यान, केंद्र शासनाच्या संयुक्त तपासणी पथकाने शालेय पोषण आहार योजनेचा आढावा घेण्यासाठी सातारा  व जळगाव जिल्ह्याला भेट दिली होती. या समितीने दिलेल्या निरीक्षणाअंती जिल्ह्यात विविध योजनांच्या अंमलबजावणीत सातारा जिल्ह्याची कामगिरी उत्तम असल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला होता. त्यावरूनच कृष्णा यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.

जीआरएम कमिटीने सातार्‍यात पाहणी केल्यानंतर त्यांना जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तब्बल 98 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. शैक्षणिक गुणवत्तेबाबत राबवण्यात आलेले नवोपक्रम वाखाण्याजोगे आहेत. याचा सर्वांनी आदर्श घ्यावा. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नियमित होणे गरजेचे आहे. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतंत्र आरोग्यपत्रिका तयार करण्यात यावी. योजनेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकाची स्थापना करून शाळांची नियमित तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी बॉडी मास इन्डेक्सनुसार करण्यात यावी. विद्यार्थ्यांची वजन व उंची यांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने विहीत केल्यानुसार असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पौष्टीक आहाराचे महत्व व गरज पटवून देणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांच्या दैनंदिन जेवणात आवश्यक असणार्या आहाराचे प्रमाण व आहराची वेळ याबाबतची जागृती शालेय स्तरावर करावी. स्वतंत्र लोकसहभाग अभियान राबवून धान्य साठविण्याची कोठी, हात धुण्यासाठी स्वतंत्र नळ व्यवस्था, जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था शाळास्तरावर करण्यात यावी. स्वयंपाकी तथा मदतनीस यांना आहार शिजवणे, त्याचे वाटप करणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता आदी विषयाबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. अनेक शाळांमध्ये आहार शिजविण्यासाठी स्वतंत्र किचन शेड नाही. शासनाने किचन शेड बांधकामासाठी दिलेले आर्थिक सहाय्यातून प्रत्येक शाळेत स्वतंत्र किचन शेडची निर्मिती करण्यात यावी. किचन शेड व त्या भोवतीच्या परिसराची स्वच्छता राखण्यात यावी.
दरम्यान, केंद्राच्या कमिटीकडून पाहणी केल्यानंतर सातारा जिल्ह्याचे कौतुक करण्यात आले आहे. कमिटीकडून जी काही निरीक्षणे नोंदवली आहे याची माहिती आम्हाला देण्यात आली आहे. त्यांची निरीक्षणे निश्‍चितच योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक आहे. राज्यात सध्या जरी जिल्हा चांगले काम करत असला तरी आणखी चांगले काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यामुळे कमिटीने ज्या सूचना दिल्या आहेत त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश संबधितांना दिले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget