Breaking News

धुळ्याच्या महापौरपदी भाजपचे सोनार; अंपळकर उपमहापौर


धुळे/ प्रतिनिधीः
धुळ्याच्या महापौरपदी चंद्रकांत सोनार यांची, तर उपमहापौरपदी कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली. 

महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे पन्नास नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी आघाडीचे 24 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने राष्ट्रवादी आघाडीच्या मंगल चौधरी यांनी माघार घेतल्याने सोनार यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडीत सद्दीन खान यांनी माघार घेतल्याने अंपळकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर महापौर सोनार आणि उपमहापौर अंपळकर यांचा सत्कार भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, सरचिटणीस हिरामण गवळी आदींनी केला.