Breaking News

‘शब्दगंध’ सामाजिक परिवर्तनाची चळवळ : डॉ. बाबुराव उपाध्ये श्रीरामपूर शाखा अध्यक्षपदी मिराबक्ष शेख यांची निवड


अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषद ही नगर जिल्ह्याचे भूषण असून, महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राला दिशा देणारी आहे. सामाजिक परिवर्तनाच्या वाटेने जाणारी शब्दगंध एक चळवळ आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले. श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या श्रीरामपूर तालुका बैठकीत ते बोलत होते. 
शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी, प्रा. डॉ. अशोक कानडे, डॉ. राजेंद्र फंड, भगवान राऊत, सुभाष सोनवणे, डॉ.दिगंबर सोनवणे, दिशा शेख आदी यावेळी उपस्थित होते. 
यावेळी बोलतांना डॉ. उपाध्ये म्हणाले की, मराठी भाषा समृद्ध करण्याचे काम जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात शब्दगंधच्या वतीने होत आहे. लेखकांनी आपल्या मनातील भावना साहित्य रूपाने व्यक्त केल्या पाहिजेत, आणि प्रभावी वास्तववादी लेखन केले पाहिजे. यावेळी शब्दगंध साहित्तिक परिषदेच्या श्रीरामपूर शाखेच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक शेख मिराबक्ष खुदाबक्ष यांची तर कार्याध्यक्ष पदी काशीनाथ चिताळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. या बैठकीत 14 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.  सुनिल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. आनंद साळवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनीलकुमार धस यांनी आभार मानले. या बैठकीस कृष्णा सरदार, रफिक शेख, बाबासाहेब पवार, सोपानराव राऊत, भास्कर दादा लगड, दिलीप शिंदे, राहुल म्हस्के, अनिल अहिरे, हिराचंद्र ब्राह्मणे, प्रा. सी. के. तळेकर, संजय साळवे, मुजीब शेख आदी उपस्थित होते.