बलशाली युवा ह्रदय संमेलनास घारेवाडीत प्रारंभ


कराड (प्रतिनिधी) : घारेवाडी (ता. कराड) येथे 18 व्या बलशाली युवा ह्रदय संमेलनास कालपासून मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. पुणे येथील प्रकाश धोका यांच्या हस्ते या संमेलनाचे आज सकाळी उदघाटन झाले. 
संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजीत देशमुख, शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंतनु कुलकर्णी, उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी अध्यक्ष संजय पाटील, अरविंद कलबुर्गी, संभाजी देवकर, प्रताप कुंभार, विश्‍वनाथ खोत, दत्तात्रय पवार, राजेंद्र घोडके, संजीव शहा, शंकर पाटील, तुषार, कुलकर्णी, स्मिता पिसाळ, विजयालक्ष्मी शेट्टी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

घारेवाडी येथील शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षी बलशाली युवा हृदय संमेलाचे यंदाच्या 18 वर्षीही जोरदार आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात राज्यासह परराज्यातून युवक-युवती ओघ वाढतच आहे. श्री. धोका यांनी जॉय ऑफ गिव्िंहग या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमचे ज्ञान तुम्ही इतराना दान करा. दातृत्व करताना मनातला करूणा भाव जागृत ठेवा. पैसे नसतील तरी चालेल तन-मन प्रेम बुध्दी व वेळ इतरासाठी खर्च करा. आठवड्यातून किमान दोन तास इतरासाठी देण्याचा संकल्प या शिबीराच्या निमीत्ताने तुम्ही करा व यशासाठी वेळेला महत्व अधिक द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले. सातारासह सांगली, कोल्हापूर, रत्नीगिरी, आमरावती, पुणे, मुंबई, अहमदनगर, जळगाव आदी जिल्ह्यासह कर्नाटक बेळगाव आदी ठिकाणांहून दोन हजारहून अधिक शिबीरार्थींच्या सहभागाने वातावरण चैतन्यमयी झाले आहे. डॉ. शंतनू कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget