Breaking News

आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गावात ऐक्य गरजेचे : क्षीरसागर


रहिमतपूर  (प्रतिनिधी) : एकविसाव्या शतकात वावरत असताना विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी गावकर्‍यांमध्ये ऐक्य असणे नितांत गरजेचे आहे, असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील बोधेवाडी येथील उपसरपंच निवडीनंतर, नूतन ग्रामपंचायत कार्यकारिणीसह गावकर्‍यांना संबोधित करताना ते बोलत होते. बोधेवाडी येथील बिनविरोध उपसरपंच निवडीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

क्षीरसागर म्हणाले, आजच्या काळात बेरोजगारी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी अशा अनेक समस्यांनी समाज ग्रासला आहे. अशा परिस्थितीत सर्व ग्रामस्थांनी एकात्मता दाखवल्यास कोणत्याही समस्येवर मार्ग काढणे सहज शक्य होईल. काही गावांमध्ये पाण्याचीही समस्या आहे. तेथील ग्रामस्थांनी प्रचंड कष्ट करून ती गावे पाणीदार केली आहेत. अशीच एकात्मता बोधेवाडीने दाखवावी मुलांचे शिक्षण तरुणांवरील संस्कार या बाबी देखील महत्त्वाचे असून याबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाच्या अनेक योजनांचा लाभ बोधेवाडी ने घ्यावा गट-तट विसरून एकदिलाने काम करावे असे सांगून त्यांनी पाणी फाउंडेशन च्या कामात बोधेवाडी ने रस दाखवून गाव पाणीदार करावे असे आवाहन केले. यावेळी निवडणुकीचे कामकाज ग्रामसेवक श्री. टेंबरे यांनी पाहिले. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच श्रीमती राशिनकर यांनी काम पाहिले.