निर्भया पथकाच्या सतर्कतेने बेपत्ता मुलाची घरवापसी


वडूज (प्रतिनिधी) : येरळवाडी (ता. खटाव) येथे ऊस तोडीसाठी औरंगाबाद येथून आलेल्या कुटुंबातील 16 वर्षाचा एक मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने पूर्ण कुटुंब अस्वस्थ झाले. मात्र स्थानिक ग्रामस्थ व पोलीस विभागाच्या निर्भया पथकाच्या मदतीने त्या कुटुंबातील मुलगा परत मिळण्यास मदत झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की रविवारण दि 6 रोजी प्रकाश रमेश श्रीसुंदर (मूळ रा. औरंगाबाद) हा कुटुंबातील सदस्यांसोबत कातरखटाव येथे बाजारात खरेदी करण्यासाठी आला होता. दरम्यान बाजारातील गर्दीत तो रस्ता भरकटला. यावेळी कुटुंबातील लोकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कुठेही सापडत नसल्याने अखेर त्यांनी वडूज पोलिसांत धाव घेतली. यावेळी त्यांनी मुलगा बेपत्ता झाला असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूला पाहणी करण्यास सांगितले. दरम्यान पोलीस ठाण्यातून गेल्यानंतर या कुटुंबातील लोकांनी येरळवाडी येथील असणार्‍या विहिरी, तलाव आदी ठिकाणीही शोधाशोध सुरू केली. मात्र प्रकाश हाती लागत नसल्याने अख्खे कुटुंब चिंताग्रस्त झाले. तेथील एका साखर कारखान्यात चिटबॉय म्हणून काम करीत असलेल्या एकाने प्रकाश याच्या नातेवाईकाला तो कराड येथील मलकापूर येथे असल्याचा फोन केला व तो सुरक्षित असल्याचेही सांगितले.

दरम्यान, याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकाश यास वडूजला आणण्यासाठी हालचाल सुरू केली. यावेळी यरेळवाडीचे सरपंच अनिल चव्हाण व ग्रामस्थ यांच्या बरोबरच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सजगणे, महिला पोलीस कर्मचारी नीलम रासकर, श्री. बर्गे, श्री. बर्गे प्रकाशला वडूज पोलीस ठाण्यात घेऊन आले. अचानक बेपत्ता झालेला प्रकाश सापडल्यानंतर या कुटूंबाने सुटकेचा निःश्‍वास घेतला. यावेळी पोलिसांनी प्रकाश यास कुटुंबाच्या स्वाधीन केल्यानंतर त्याने आपण उसाच्या गाडीतून तिकडे पोहचलो असल्याची माहिती त्याने पोलिसांना व कुटूंबियांना दिली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget