Breaking News

ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये मध्यरात्रीची उपासना

नगर । प्रतिनिधी - 
ख्रिस्त जन्मानिमित्त माणिकचौक परिसरामध्ये असणार्‍या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सव व नूतन वर्ष स्वागत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यानिमित्त दि. 23 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये 23 डिसेंबरला शुभ्र देणगी, 24 रोजी रात्री साडेअकरा वाजता मध्यरात्रीची उपासना, 25 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता ख्रिस्तजयंती उपासना, 26 डिसेंबर रोजी स्नेहमेळावा,27ला गॉर्डन हॉल मेमोरियल चर्च येथे शब्बाथ शाळा कार्यक्रम, त्यानंतर 28 ते 30 डिसेंबरदरम्यान चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.दि. 31 डिसेंबर रोजी प्रभूभोजन विधीनिमित्त रेव्हरंड पी. जी. मकासरे यांचा नवा करार यावर संदेश, तसेच मध्यरात्रीची उपासना संदेश झाला. नववर्षदिनी 1 जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये नवीन वर्ष उपासना झाली.