Breaking News

रस्ते विकासातून होणार ग्रामीण भागाचा कायापालट : खा.रावसाहेब दानवे


चिखली,(प्रतिनिधी): जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण भागाचा कायापालट होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी येथील रस्त्यांचा विकास राज्य सरकार करीत आहे, यातून ग्रामीण भागाचा कायापालट होणार असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. शनिवार, दि. 29 डिसेंबर रोजी चिखली विधानसभा मतदार संघातील भडगांव ते जालना जिल्ह्यातील आढा या दरम्यानच्या जोडरस्त्याचे भूमीपूजन करतांना ते बोलत होते. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले पाटील, संतोष पाटील लोखंडे, सुरेशअप्पा खबुतरे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रामीण व दुर्गम भागातील गावे परस्परांना जोडली जावी आणि यातून या भागातील शेतकरी, शेतमजूर व गावकर्‍यांना जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाकडून जोडरस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत सदर रस्त्याचे बांधकाम लवकरच सुरू हणार आहे. खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलतांना खा. दानवे यांनी राज्य व केंद्र शासनाने रस्ते विकासाला अग्रक्रम दिला असल्याचे सांगितले. या प्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विक्की हरपाळे, पंचायत समिती सदस्य संदीप उगले,गणेशराव साखरे, सरपंच केशव साखरे, विष्णू उगले, रुईखेड मायंबा येथील सरपंच विष्णू उगले, अनिल अंभोरे, तसेच गावकरी उपस्थित होते.