Breaking News

डॉ. गदगकर हायस्कूलचे विज्ञान प्रदर्शनात यशसातारारोड, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि सातार्‍यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने सातार्‍यात झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञानप्रदर्शनात येथील डॉ. गदगकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी उज्वल यश संपादन केले. 

या विज्ञानप्रदर्शनात मोठ्या गटात प्रगती भगत व प्रणाली बर्गे द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यांनी संत्र्याच्या सालीपासून तेलनिर्मिती हे उपकरण या प्रदर्शनात सादर केले होते. त्यांना शिक्षिका ए. त्रही. 
इंगवले व एन. जी. मोरे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. अतुल गदगकर, एकनाथराव फाळके, शिवाजीराव फाळके, जगन्नाथराव फाळके, वसंतराव गाढवे, सौ. मायादेवी भिसे, मुख्याध्यापिका सौ. आर. आर. पाटील, पर्यवेक्षक श्री. डी. बी. झांजुर्णे आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षक, कार्यालयीन सहकारी व ग्रामस्थ आदींनी यशस्वी विद्यार्थींनी व मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.