Breaking News

कथामालेतून अभिरुची, स्मरणशक्ती व भाषिक कौशल्याचा विकास-मुळी
माजलगाव (प्रतिनिधी)-: काथाकथनाच्या माध्यमातून भाषिक कौशल्य,स्मरणशक्ती,कल्पनाशक्ती,अभिव्यक्ती,अभिरुची या क्षमतांचा मोठ्या प्रमाणावर विकास होतो असे मत महात्मा फुले विद्यालयाची शाखा अखिल भारतीय साने गुरुजी काथामालेच्या रोप्य वर्षीय कार्यक्रमाच्या उदघाटन कार्यक्रमावेळी मा.मु.अ.संतुक मुळी यांनी व्यक्त केले.बालिका दिनी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  मुला मुलीचे भावविश्व कथात्मक अविष्कारातून उघडविण्याच्या हेतूने अ.भा.साने गुरुजी कथामाला शाखा महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने मा.आ. डी.के.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदरील स्पर्धा हि तीन गटात विभागण्यात आली होती.या स्पर्धेसाठी तालुक्यातील जवळपास ५० शाळेने सहभाग नोंदवला.हे वर्ष या कथामालेचे रोप्य मोहस्तवी वर्ष आहे.यावेळी उदघाटक म्हणून मा.मु.अ.संतुक मुळी,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड.एस.आर. शर्मा, ऍड.ए.एम.मोगरेकर, ऍड. आर. डी. भिलेगावकर, आर.बी. देशमुख, बी.व्ही.जोशी,बी.बी. भोरजे, के. व्ही. गाजरे, म ु.अ.प्रदीप भिलेगावकर,प्रभाकर साळेगावकर,अभिमन्यू इबिते, व्ही. एन.कुलकर्णी यांची उपस्थिती होती.यावर्षी हा कायक्रर्म बालिका दिनी घेण्यात आला.काथाकथानाने संस्कारासाठी पूरक आणि पोशख  वातावरण तयार होते.वाचनाची गोडी लागून विचार प्रक्रिया वाढते.भाव समृद्धी,अनुभव विश्व विस्तारते आणि सुप्त गुणांचा विकास घडवण्याचा कथामालेचा हेतू आहे.अध्यक्षीय भाषणात ऍड.एस.आर.शर्मा म्हणाले की,जीवनाचा सार सांगणारा घटक म्हणजे कथा आहेत.समृद्ध जीवन जगण्यासाठी कथा वाचन करणे आवश्यक आहे. चतुरता निर्माण करण्याचे काम कथेतून होते.या कार्यक्रमाने प्रास्ताविक डी.बी.रामुळे यांनी केले तर सुत्रसंचलन जी.आर.राठोड तर ग.वा.मुळाटे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे अहवाल वाचन माधव कर्णे तर बक्षीस वितरण मा.मु.अ.रंगनाथ सावंत यांच्या हस्ते झाले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.