‘बिहारचे लोक राहतात इथे, त्यांच्या बायकांना होतात मुले तिथे’

Image result for सुरेश धस
.
बीड/ प्रतिनिधीः 
बीड विधान परिषदेवरील भाजप आमदार सुरेश धस यांनी बिहारी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिहारी लोक राहतात इकडे आणि तिकडे त्यांच्या बायकांना मुले होतात, असे खळबळजनक वक्तव्य धस यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
बिहारचे लोक येतात आणि पेढा देतात. काय झाले, असे त्यांना विचारले, तर मुलगा झाला असे सांगतात. कुठे झाला तर तिकडे झाला. ते राहतात इथे आणि त्यांना मुले तिकडे होतात, असे वक्तव्य त्यांनी एका जाहीर सभेत केले. उपस्थितांनी त्यांना हसून दाद दिली; पण यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही भाजपचे विधान परिषदेतील सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पंढरपूर येथील प्रचार सभेत लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता धस यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget