Breaking News

भारताचा ऑस्ट्रेलियात वनडे मालिकेतही ऐतिहासिक विजय


केदार जाधवने ५० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताने २३१ धावांचं लक्ष्य ४९.२ षटकांमध्येच पूर्ण केलं. यावेळी भारताने फक्त तीन गडी गमावले. भारतासाठी महेंद्रसिंग धोनीने ८७ (११४), केदार जाधव ६१ (५७), कर्णधार विराट कोहलीने ४६ (६२) या खेळाडूंनी सर्वाधिक धावा केल्या. तर जे रिचर्डसन, पीटर सिडल आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर भारतासाठी युजवेंद्र चहलने ६ भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.


भारताने ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर आतापर्यंत द्विपक्षीय एकदिवसीय मालिका एकदाही जिंकलेली नाही. या प्रकारात भारताने १९८५ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २००८ मध्ये सीबी सीरीज आपल्या नावावर केली होती. मेलबर्न भारताला विजय मिळाला तर या संपूर्ण दौऱ्यात एकही मालिका न गमावण्याचा विक्रमही टीम इंडिया करेल.

ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या संघात दोन बदल केले. बिली स्टानलेक आणि एडम झांपा यांना संघात स्थान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न मैदानात भारताविरुद्ध १४ सामने खेळले असून यात भारताने पाच सामने जिंकले आहेत. २००८ मध्ये भारताने या मैदानात शेवटचा सामना जिंकला होता.