Breaking News

मुस्लिम मंत्र्याची शिव मंदिरात पूजा


जयपूर - देशभरात मंदिर प्रवेशावरून वाद सुरू असताना राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दुर्मिळ चित्र सोमवारी पाहायला मिळाले. राजस्थानमधील एका मुस्लिम मंत्र्यांनी शीव मंदिरात जावून मनोभावे पूजा केली. पोखरण येथील साडोलाल शीव मंदिरात जाऊन पुजार्‍यांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने रुद्राभिषेक केला. 

सोमवारी राजस्थानमधील अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री शाले मोहम्मद यांनी पोखरणमधील सुप्रसिद्ध रामदेवरा शीव मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील मोहम्मद हे एकमेव मुस्लिम मंत्री आहेत. मोहम्मद हे इंडो-पाक सीमेवरील सिंधी-मुस्लिम समाजाचे धार्मिक गुरू गाझी फकीर यांचे पुत्र आहेत. राजस्थानमध्ये विधानसभेच्या दोनशे जागा असून मोहम्मद हे एकमेव मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.