Breaking News

संगमनेर शेतकरी संघ अटल महापणन पुरस्काराने सन्मानित


संगमनेर/प्रतिनिधी मा.महसूल व कृषीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारात दीपस्तंभ ठरलेल्या संगमनेर शेतकी संघास सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्यावतीने दिला    जाणार्‍या यावर्षीच्या अटल महापणन पुरस्कार व सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले आहे.  


सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदीर येथे झालेल्या या कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख, अनुप कुमार, सुश्री शुक्ला, योगेश म्हस्के, दिपक तावरे, सतिष सोनी    शिवाजी पहिनकर, सुनिल पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार शेतकरी संघाचे संचालक बाळासाहेब वाळके, सुनिल कडलग, रामभाऊ कडलग, अर्जुन घुले, रविंद्र गायकवाड, पाटील,    भरत काळे यांनी हा पुरस्कार स्विकारला. राज्यातील सहकारी पणन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अटल महापणन विकास अभियानामध्ये सन 2016    -2017 या वर्षात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल शेतकरी संघास हा पुरस्कार मिळाला आहे.