Breaking News

सलग चौथ्या दिवशीही बेस्ट कर्मचार्‍यांचा संप सुरूमुंबई : सलग चौथ्या दिवशीही बेस्ट कर्मचार्‍यांचा संप सुरूच आहे. कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्याने कामगार संपावर ठाम आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतरही संपावर तोडगा न निघाल्याने शिवसेनेचीही नाचक्की झाल्याचे बोलले जात आहे.
सकाळपासून धारावी बेस्ट आगारातून एकही बस बाहेर पडलेली नाही. सर्व बेस्ट कर्मचारी येऊन आगारासमोर बसले असून कोणीही कामावर जाऊ नये आणि एकही बस बाहेर पडू नये यासाठी ते आग्रही आहेत. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, ज्युनिअर ग्रेड बदलून त्यांची वेतन निश्‍चिती पूर्वलक्षी प्रभावाने करावी, मार्च 2016 मध्ये संपलेला वेतन करार पुन्हा करावा आदी मागण्या या संपात करण्यात आल्या आहेत. बेस्टचे सुमारे 30 हजार कामगार संपावर गेले आहेत. मात्र, महापालिकेने संप बेकायदेशीर ठरवून कर्मचार्‍यांना मेस्मा कायद्याअंतर्गत निवासस्थाने रिकामी करण्याची नोटीस बजावली. तरीही कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत.