Breaking News

राहुरीत तहसिलदारांची बेधडक कारवाई वाळुचा ढंपर व टेम्पो रंगेहाथ पकडला
राहुरी/प्रतिनिधी
बारागाव नांदुर मुळानदीपात्रातुन शासनाच्या मालकीची चोरट्या मार्गाने वाळु उपसा करुन विक्रीसाठी घेवुन जाणारा ढंपर व टेंम्पो चालकाचा महसुल पथकाने पाठलाग करत कारवाई केल्याने चोरटी वाळु वाहतुक करणार्‍यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. 

मुळानदी पात्रात वाळु तस्करांनी चांगलाच उच्छांद मांडला असुन काल बुधवारी रात्री 11 वाजे दरम्यान बारागाव नांदुर येथील मुळापात्रातुन शासनाच्या मालकीची काही वाळु तस्कर चोरुन वाळु वाहतुक करत असल्याची गुप्त माहिती महसुल पथकाला लागल्याने तहसिलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी अदिनाथ थोरात, नेरकर व वाहन चालक माऊली राऊत यांनी वाळु उपसा करुन वाळु वाहतुक करतांना राहुरी शहरातील टेंम्पो रंगेहात पकडला, तर नगर मनमाड रोडवर नगर येथील विना नंबरचा एक ढंपर महसुल पथकाने पाठलाग करुन पकडत तहसिल कार्यालयात आणला सदर कारवाई झाल्याचे वाळु तस्करांना कळताच महसुल व पोलिस यंत्रणेवर लक्ष ठेवत असलेल्या वाळु तस्करांचे झाडी करण्यासाठी असलेले पंटर यांची अंधारात चांगलीच पळापळ झाली होती.

 महसुल पथकाने कारवाई करताच मुळा नदीपात्रासह राज्य मार्गवर वाळु तस्करांचा संन्नाटा दिसुन आला. मुळा व प्रवरा पात्रातुन शासनाच्या मालकीची चोरीटी वाळु वाहतुकीवर महसुल पथकाने कारवाईचा बडगा सुरु केला, असुन वाळु तस्करांचे आगार म्हणुन समजले जात असलेले तालुक्यातील बारागाव नांदुर परिसरात वाळु तस्करांनी मोठा उच्छाद मांडला असून यांसह शहरातील नव घाट गणपती घाट व देसवंडी रोड येथील मुळापात्रातही रात्रीच्या दरम्यान वाळु उपसा होत असून महसुल प्रशासनाने या वाळु तस्करांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी नागरिकांत होत आहे.