Breaking News

अशोकराज स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात


कराड (प्रतिनिधी) : कोळे येथील अशोकराज इंटरनँशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. त्यानिमित्ताने विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मळईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक थोरात होते. 


यावेळी रोटरी शिक्षण संस्थेचे सचिव विलासराव पाटील, शाळेचे संस्थापक शरद चव्हाण, उपाध्यक्ष अनिल जाधव, सचिव वनिता चव्हाण, प्राचार्या सीमा धर्माधिकारी, व्यवस्थापक सुनिल मोरे, मेघा कराळे आदी उपस्थित होते. रेश्मा देवकर व कांचन सुतार यांनी सुत्रसंचालन केले. संध्या पुजारी यांनी आभार मानले.