Breaking News

मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने नगरकरांना दिनदर्शिकेची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने नगरकरांना दिनदर्शिकेची भेट देण्यात आली. जिल्ह्यातील पर्यटन चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची माहिती असलेली ही नुतन वर्षाची दिनदर्शिका मनसे विद्यार्थी सेनेने छापली आहे. या दिनदर्शिकेचे दिल्लीगेट वेस येथे नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित, अभिषेक मोरे, अनिकेत शियाळ, जयराम खारगे, मंथन पुंड, प्रणव राऊत, भैय्या शेख, अमन शेख, गणेश शिंदे, अविनाक्ष क्षेत्रे, अमोल गीते आदिंसह विद्यार्थी सेनेचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
परेश पुरोहित म्हणाले की, मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने दरवर्षी नगरकरांना मोफत दिनदर्शिकेचे वाटप केले जाते. यावर्षी 5 हजार प्रती नागरिकांना वाटण्यात आल्या असून, या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. जिल्ह्यातील पर्यटन चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी दिनदर्शिकेवर पर्यटन स्थळाची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पर्यटन वाढल्यास विकासाला वेगाने चालना मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.