Breaking News

सारस्वत बँकेतर्फे ‘वॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा’ प्रदान


कराड (प्रतिनिधी) : बँकिंग सेवा पुरविणारी सारस्वत बँक ही भारतातील दुसरी आणि सहकारी बँकांच्या क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंगिकार करून ग्राहकांना कार्यक्षम, प्रभावी सेवा देण्यासाठी बँक नेहमीच अग्रेसर असते. हाच वारसा पुढे नेत बँक आपल्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण डिजीटल सेवा प्रदान करणार आहे.

फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या वॉट्सअ‍ॅप मेसेजिंग व्यासपीठाने नुकतीच ‘वॉट्सअ‍ॅप फॉर बिझनेस’ ही सेवा सुरु केली आहे. युजर इनिसीएशनला प्रतिसाद म्हणून सॉफ्टवेअर इंटरॅक्शनचा उपयोग करत टेक्स्ट मेसेजेसचे नोटीफीकेशन, बोर्डिंग पासेस, पावत्या, तिकीट, अकाऊंट स्टेटमेंट यांसारख्या गोष्टी ग्राहकांना पाठविल्या जातील. ‘वॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा’ या सेवेच्या माध्यमातून सारस्वत बँकेच्या ग्राहकांना एसएमएसच्या ऐवजी वॉट्सअ‍ॅप नोटीफीकेशन मिळू शकतील. ग्राहक येथे संवादही साधू शकतील. शिवाय खात्यातील शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट मिळविणे इत्यादी गोष्टी याद्वारे साध्य होतील. मोबाईल बँकिंग नोंदणी, बँकेच्या इतर उत्पादनाची माहीती, विनंती-चौकशी, अर्ज-अ‍ॅप डाऊनलोड करणे इत्यादी गोष्टी टप्या-टप्याने उपलब्ध होतील.