Breaking News

राम मंदिरावरून भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न- अरविंद सावंत


राम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलीय. भाजप संघाला ढाल म्हणून वापरत असल्याचं ते म्हणाले. राम मंदिराच्या मुद्यावर संघाचे सर कार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यवरही त्यांनी सकडून टीका केली.


सावंत म्हणाले, "जोशी यांचं वक्तव्य म्हणजे पुन्हा एक जुमला आहे. 2025 पर्यंत मंदिर पूर्ण होणार की सुरू करणार त्यातही संदिग्धता आहे. भाजप केवळ लोकांना फसवत आहे. पहिले मंदिर, नंतर सरकार हीच शिवसेनेची भूमिका कायम आहे."

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना राम मंदिराच्या मुद्यावरून आक्रमक असून सेनेने भाजपला टार्गेट केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जोशी यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेला भाजपला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे.