Breaking News

वस्तीगृह च्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धावले जामखेड येथील सिंधी पंजाबी समाजाचे तरुण


जामखेड ता.प्रतिनीधी ( समीर शेख )

नागेश विद्यालय जामखेड येथे रयत शिक्षण संस्थेचे शाळेच्या आत एक विद्यार्थी वस्तीगृह आहे सर्वकाही सोयीस्कर आहे पण पाणी साठवण्याचा हौद हा जुन्या पद्धतीचा आहे खूप जुना झालेला असल्यामुळे त्यातून अस्वच्छ पाणी विद्यार्थ्यांना पिण्यास मिळत होते व त्यामुळे कदाचित आरोग्य चिंतेय असायचे ,याची कळकळ व जाणीव घेऊन जामखेड येथील सिंधी पंजाबी समाजाचे तरुण एकत्र येऊन शुद्ध पाणी मिळण्यासाठी वाटर प्युरीफाय व दोन पाण्याचे जार , सुपूर्द केले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, स्कूल कमिटी सदस्य विठ्ठलआण्णा राऊत , मुक्तारभाई सय्यद, वस्तीगृहाचे अधीक्षक शिर्के आदी उपस्थित होते यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक पवार म्हणाले समाजामध्ये सिंधी पंजाबी आणि जैन समाजातील लोक गोरगरिबांसाठी नेहमीच धडपड करत असतात हे माझे अनुभव आहेत अमित गंभीर यांनी आपल्या समाजातील युवा समवेत पैसे जमा करून शाळेच्या विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी दिलेले वाँटर फिल्टर आणि पाण्याचे 2 जार दिले खरोखर हे उल्लेखनीय काम आहे यांच्या हाताने समाजसेवा घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो  तसेच यावेळी कोठारी म्हणाले वसतिगृहातील हौद फार जुना झालेला आहे त्यामध्ये मुलांना फार दूषित पाणी पिण्यास मिळत होते जर आपण आजारी पडलो तर आपण दवाखान्यात जाऊन खर्च करू शकतो परंतु या वस्तीगृहातील साठ मुलांना अशुद्ध पाणी पिल्यामुळे शारीरिक दृष्ट्या योग्य नाही ही बाब हे लक्षात आले.

अमित गंभीर हे निरंकारी संस्थेच्या मार्फत जामखेड मध्ये तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी स्वच्छता अभियान आणि विविध सामाजिक कार्यक्रम करत असतात.
यावेळी विठ्ठलआण्णा राऊत, मुक्तारभाई, स्वप्नील खाडे हे सर्व दोन शब्द बोलले या कार्यक्रमास अमित गंभीर ,गौरव अरोरा, प्रशांत आरोरा ,रवींद्र गुलाटी ,गुल्लुशेठ आहूजा ,चेतन आरोरा, विशाल गुलाटी, दिलीप संगई यांच्या सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फाळके यांनी केले तर आभार ढाळे यांनी मानले.