Breaking News

शेवगावमध्ये रब्बी पिकांच्या आणेवारीत कमी-जास्तशेवगाव/प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यात दुष्काळात सुकाळ 79 गावची रब्बी पिक नजर आणेवारी पन्नास पैशाच्या पुढे लावण्यात आली आहे. दुष्काळ असतानादेखील आणेवारी कुठल्या आधारावर लावली गेली. असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.

शेवगाव तालुक्यातील 79 गावे हि रब्बी पिकाची असुन सन 2018-19 या सालची रब्बी पिकाची नजर आणेवारी शेवगाव, बोधेगाव, चापडगाव, एंरडगाव, भातुकडगाव, ढोरजळगाव मंडळाधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार पन्नास पैशाच्या पुढे जाहीर करण्यात आली आहे. खरीपाच्या 34 गावची आणेवारी पन्नास पैशाच्या आत असताना रब्बीत सुकाळ कसा झाला ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. यंदा निसर्गाचा कोप झाल्याने खरीप व रब्बी दोन्ही हंगाम पूर्ण वाया गेले आहेत. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सरासरीच्या तुलनेत फारच कमी पर्जन्यमान झाल्याची नोंद झाली आहे. यामुळेच शासनाने शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. तरीही रब्बी पिकाची नजर आणेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त जाहीर करून प्रशासन शेतकर्‍यांची थट्टा करीत आहे. जाहीर केलेल्या या आणेवारीचा फेरविचार करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

रब्बी गावे व आणेवारी आपेगाव, बालमटाकळी, चापडगाव, गरडवाडी, जळगाव, लखमापुरी, मळेगाव, निंबे, सोनविहीर, शहापुर, ठा.पिंपळगाव या गावची 52 पैसे आखतवाडे, बर्‍हाणपुर, नांदुरविहीरे, वडूले बु,वडूले खु 53 पैसे,अंतरवाली खु, गदेवाडी, खडके, कांबी, कुरुडगाव, लाखेफळ, मलकापुर, तळणी, वाघोली, रावतळे 54 पैसे, आव्हाणे बु, आव्हाणे खु, बक्तरपुर, दहिगाव शे, घोटण, हातगाव, खामपिंप्री, मडके, मुंगी, प्रभुवाडगाव, पिंगेवाडी, सामनगाव 55 पैसे, भायगाव, 56 पैसे, देवटाकळी 57 पैसे, डो. आखेगाव, मुर्शतपुर, 58 पैसे, भातकुडगाव, खरडगाव 59 पैसे, ढोरजळगाव शे, ढोरजळगावने, शेवगाव 60 पैसे, आखेगाव, दादेगाव, शहाजापुर, वरूर बु, 61 पैसे, अमरापुर, बोडखे, जोहरापुर, खुंटेफळ, सुलतानपुर खु . सुलतानपुर बु, ताजनापुर 62 पैसे, हिंगनगावने, खानापुर, कर्‍हेटाकळी, खामगाव, वरुर खु 64 पैसे, भगुर, मजलेशहर, विजयपुर 65 पैसे, भाविनिमगाव, 66 पैसे, अंत्रे, दहिफळ, ढोरहिगंनी, ढोरसडे, कर्जत खु, शहरटाकळी, रांजणी 67 पैसे, दहिगावने, देवळाने, एंरडगाव, घेवरी, लाखेफळ 68 पैसे

अशा प्रकारे 52 पैसे ते 68 पैसे रब्बीची नजर आणेवारी जाहीर करून शेतकर्‍यावर अन्याय केला आहे. पिकच नाहीतर एवढी आणेवारी कोणत्या धरतीवर लावली असा संतप्त सवाल प्रशासनाला केला जात आहे.