Breaking News

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत वैभवी मोरे हिचे यशपरळी (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुला नुकत्याच झालेल्या 64 व्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सातार्‍यात यशवंतराव चव्हाण इन्स्टिस्टूट ऑफ सायन्स येथे इयत्ता 11 वीतील विद्यार्थीनी वैभवी गणेश मोरे हिने उज्वल यश संपादन केले. या स्पधेंत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघातून सहभागी झालेल्या वैभवीने या स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक व वैयक्तिक रौप्यपदक पटकावले. तिला कारी येथील समर्थ मल्लखांब संघाच्या प्रशिक्षक माया मोहीते यांचे नियमित मार्गदर्शन मिळते. प्राचार्य डॉ. के. जी. कानडे व कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख श्री. गुजर यांनी तिला प्रोत्साहन दिले.