Breaking News

डंपर बसच्या धडकेत वर्येत तीन प्रवासी जखमी


सातारा (प्रतिनिधी) : वर्ये (ता. सातारा) येथे एसटी बसला डंपरने दिलेल्या धडकेत एसटीतील तिघे प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा आगाराची एसटी बस (क्र. एमएच 12 ईएफ 6148 ) ही धावडशी येथून सातारा बसस्थानकाकडे परत येत होती. 

त्यावेळी वर्ये येथे वेण्णा नदीच्या पुलालगत पिवळ्या रंगाच्या डंपरने (क्र. एमएच 11- 268) एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर डंपर चालकाने तेथून डंपरसहीत पळ काढला आहे. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून एसटी बसचा पाठीमागचा भाग, शिडी, बंपर, लाईट व पत्रा अँगल आदीचे सुमारे 25हजाराचे नुकसान झाले आहे.