Breaking News

मिरा एखंडे मृत्यूप्रकरणी मुक मोर्चा; डॉ.साबळेंविरूध्द कारवाईची मागणी


माजलगाव, (प्रतिनिधी):-प्रसुती दरम्यान मयत मीरा एखंडे बालकाचा झालेला मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा परिणाम असून या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी येथील सर्वपक्षीय संघटनांनी विभागीय कार्यालयावर सकाळी मूक मोर्चा काढून आपला आक्रोश रस्त्यावर व्यक्त केला.


येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे व नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. प्रसुती दरम्यान प्रस्तुत महिलेजवळ जबाबदार डॉक्टर उपस्थित नसल्याने व नर्सच्या माध्यमातून याठिकाणी प्रसूती करण्यात आल्याने यावेळी मीरा एखंडे व नवजात बालकाचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला होता. हा प्रकार डॉक्टरांच्या बेजबाबदार पणाचा प्रकार आहे. असता जर जबाबदार डॉक्टरांची यावेळी उपस्थिती असती तर महिला व बालकाचा प्राण वाचला असता. अशा बेजबाबदार डॉक्टरांवर त्वरीत निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, यासाठी आज माजलगाव शहरात सर्वपक्षीय संघटनांनी मूक मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला या मूक मोर्चाला भारिप बहुजन, संभाजी ब्रिगेड, रिपाई, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कॉंग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, मानवी हक्क अभियान, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, विद्यार्थी संघटना, शिवा संघटना,ई पक्षांनी, संघटनांनी या मोर्चात सामील होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. हजारो मोर्चेकर्‍यांनी येथील उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा नेत आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्याकडे सादर केले. 

निरागस चेहर्‍याने त्या मुलीही मोर्चात सहभागी झाल्या होत्या .माजलगाव येथे आरोग्य यंत्रणेविरुद्ध काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मिरा एखंडे यांच्या सात मुलीही सहभागी झाल्या होत्या. आईच्या मायेपासुन पोरक्या झालेल्या त्या सातही मुलींचा निरागस चेहरा अनेकांच्या नजरेत येत होता