Breaking News

सरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र


संगमनेर/प्रतिनिधी
निर्धारित वेळेत जात प्रमाणपत्र सादर केले नाही या कारणावरुन कोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. अन्य एका सदस्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.एकाचवेळी पाच जणांच्या पदावर गंडातर आल्याने गावात खळबळ उडाली आहे.

सरपंच शरद बबन थोरात, ग्रामपंचायत सदस्य विमल धोंडीबा काशिद, अनिल शिवाजी जोंधळे, कल्पना सचिन पारधी, आनंदा गीताराम गवळी अशी सदस्यत्व रद्द झालेल्यांची नावे आहेत. संगमनेर तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक 2015 मध्ये झाली होती. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी निर्धारीत वेळेत आपले जात प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित होते. त्यांनी जात प्रमाणपत्र वेळेत सादर केले नसल्याने जिल्हाधिकार्‍यांसमोर या प्रकरणी सुनावणी सुरु होती. या शिवाय राधिका बाळासाहेब पवार यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात अपिल केलेले असल्याने त्यांच्यासंबधीचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. कोकणगाव ग्रामपंचायतीत अकरापैकी पाच सदस्य अपात्र ठरले आहेत. एकाचा निर्णय प्रलंबित असल्याने ग्रामपंचायत अल्पमतात आली आहे.