ॠऑगस्टा वेस्टलँड’प्रकरणी गांधी कुटुंबाने स्पष्टीकरण द्यावे’


मुंबई : प्रतिनिधीः

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात मोठा घोटाळा उघड झाला आहे. इटलीच्या न्यायालयाने या प्रकरणी दोषींना शिक्षाही सुनावली आहे. या प्रकरणातील दलाल ख्रिश्‍चयन मिशेल याच्याकडे केलेल्या चौकशीत, त्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) न्यायालयात दिली आहे. यावर आता गांधी कुटुंबाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात मिशेल हा महत्वाचा माणूस आहे. आता त्याच्या चौकशीत या घोटाळ्यातील अनेकांची ओळख पुढे येऊ लागली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माझ्यात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप फडणवीस यांनी केला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget