Breaking News

शिवसेना-भाजपचे भांडण प्रियकर-प्रेयसीचेः अ‍ॅड. आंबेडकर

नाशिक/ प्रतिनिधीः 
शिवसेना आणि भाजप यांच्यात पती पत्नीचे नाही, तर प्रियकर- प्रेयसीचे भांडण आहे, अशी खोचक टीका भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल.

नाशिकमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली. त्या वेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसवरही त्यांनी टीका केली आहे. एमआयएमला सोबत घेणार असाल, तर आम्ही तुमच्यासोबत नाही, असे काँग्रेस म्हणते. त्यावर काँग्रेसला मुस्लिमांची मते कशी काय चालतात? असा प्रश्‍न अ‍ॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. शिवसेना आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नाही, हे महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात अनेकदा पाहिले आहे. तरीही दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ आणि भाजप लहान भाऊ अशी भूमिका शिवसेनेची आहे; मात्र शिवसेनेच्या तुलनेत जास्त आमदार आल्याने भाजपला ही भूमिका मान्य नाही. आता मोठा भाऊ, लहान भाऊ या नात्याऐवजी त्यांच्यात प्रियकर- प्रेयसीचे नाते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.