Breaking News

मागितले घरासाठी वीज कनेक्शन अन् हाती पडले चक्क वीजबिल ....


वडूज (प्रतिनिधी) - नढवळ ता. खटाव येथील एका नागरिकाने गेल्या सहा महिन्यांपूर्वी घरी वीज मिटर बसवण्यासाठी डिपॉझिट भरले होते. मात्र सहा महिन्यांपासून आज अखेर त्या व्यक्तीला मीटर मिळाला नाही. मात्र चक्क त्याला वीजबिलच देण्यात आले. वीज नसताना ही आपल्याला बिल कसे आले या प्रकाराने सबंधीत व्यक्ती मात्र चांगलाच हतबल झाला आहे. या प्रकारामुळे महावितरणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की नढवळ (मानेवस्ती)येथील प्रकाश विठ्ठल माने यांनी आपल्या घरात वीज कनेक्शन मिळावे यासाठी गेल्या सहा महिन्यांपूर्वीच डिपॉझिट रक्कम भरली. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून मिटर मिळत नसल्याने त्यांनी कार्यालयात हेलपाटे मारणे सुरू केले.

दरम्यान आज भेटेल, उद्या भेटेल या अपेक्षेत गेले सहा महिने त्यांनी मिटर मिळण्याची वाट पाहिली. मात्र वीज कनेक्शन काही मिळालेच नाही. मात्र, आज अचानक त्यांना घरच्या कनेक्शनचे चक्क 570 रुपये देयक असलेले बिल आले. घरी वीज पुरवठा केला नाही मात्र बिल नेमकं कशाचं आलं या प्रश्‍नाने चक्क हादरूनच गेले.
एवढा पाठपुरावा करून वीज कनेक्शन मिळाले नाही मात्र बिल मिळाले या प्रकाराची चर्चा मात्र आता सर्वत्र सुरू झाली. एकीकडे दुष्काळात तालुक्यातील जनता होरपळत असताना काही कार्यालयाकडून नागरिकांची थट्टा केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली. आता वीज वितरण कंपनी नेमकी याबाबत काय कार्यवाही करणार याकडे लक्ष अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

खटाव तालुका दुष्काळी यादीत समावेश करण्यापासून ते विध्यार्त्यांना एसटी पास मिळण्यापर्यंत सामाजिक कार्यकर्त्याना आंदोलन करावे लागले. मात्र दुष्काळात या विज वितरण कंपनी कडून सामन्यांची थट्टा केली जातेय या मुळे सबंधीत विभागाने भोंगळ कारभार थांबवणे गरजेचे आहे अन्यथा सामांन्यातून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.