Breaking News

सम्राट निकम खूनप्रकरणी आठ जणांना अटक


सातारा (प्रतिनिधी) - पेट्रोल पंप आणि हॅाटेल व्यवसायातील पैसे देण्या- घेण्याच्या कारणावरुन कोडोली येथील सम्राट निकम (वय27) याच्या खूनप्रकरणी सातारा पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे.
पूर्ववैमनस्यातून मंगळवारी (दि. 15) दुपारी सम्राट निकम या हॉटेलचालकाचा धारदार शस्त्राने वार करून आणि भर रस्त्यावर ठेचून खून करण्यात आला होता. मंगळवारी दुपारी दुचाकीवरुन घरी जात असताना सम्राट चौकामध्ये दबा धरुन बसलेल्या आरोपींनी हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम यांच्यावर अचानक हॅाकी स्टिक आणि सत्तूरने वार केल होते. त्यात सम्राटचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंंतर पोलिसांनी धरपकड करुन आठजणांना ताब्यात घेतले आहे. 

मात्र अद्याप या प्रकरणातील तीन ते चार जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकाराने सातार्‍यासह कोडोली, गोडोली, एमआयडीसी परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली होती. या खूनप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून शोधमोहिम तीव्र करीत मयूर राजेंद्र जाधव, बाळकृष्ण जाधव, शशिकांत जाधव, विजय दिनकर जाधव, बाळासाहेब तांगडे (सर्व रा. कोडोली, सातारा ) सौरभ खरात उर्फ कुक्या, धीरज शेळके, संग्राम दणाणे (सर्व रा. मल्हार पेठ, सातारा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. 

जुना वाद आणि हॅाटेल व वसायातील पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरुन संबधित संशयितांनी कट रचून हा खून केला असल्याचे सम्राट निकमचे चुलते संजय निकम (वय 51, रा. कोडोली सातारा) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.