Breaking News

शार्टसर्किटने ऊस जळून तारगावला साडेसहा लाख रुपयांचे नुकसान


रहिमतपूर (प्रतिनिधी) : शेतामध्ये असणार्‍या इलेक्ट्रिक खांबावर शार्टसर्किट झाल्यामुळे तारगांव (ता. कोरेगाव) येथील गणपती उत्तम डांगे यांच्या शेतातील साडेतीन एकर ऊसासह ठिबक, पीव्हीसी पाईप जळून साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

गणपती डांगे यांचे तारगाव येथील माळ नावाच्या शिवारात तोडणीस आलेला साडेतीन एकर ऊस होता. परंतू सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान शेतामध्ये असणार्‍या खांबावरील तारामधून ठिणग्या पडून ऊसाला आग लागली. वार्‍यामुळे आग संपूर्ण शेतात पसरली. त्यामध्ये ऊसातील ठिबक, पीव्हीसी पाईपसह संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. यापूर्वीही पाच वर्षापूर्वी गणपती डांगे यांचा अडीच एकर ऊस जळाला होता. वीज वितरण महामंडळाने झालेली नुकसान भरपाई दयावी अशी मागणी डांगे यांनी केली आहे. तलाठी पृथ्वीराज पाटील , पोलीस पाटील जयराम पाटील यानी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. रहिमतपूर पोलीस स्टेशनला जळीताच्या या घटनेची नोंद करण्यात आली आहे .