झेप साहित्य संमेलनात लोककलावंतांचा गौरवचिखली,(प्रतिनिधी): नुकत्याच झालेल्या पाचव्या झेप मराठी साहित्य संमेलनामध्ये राज्यभरातून आलेल्या प्रतिभासंपन्न लोककलावंतांचा यथोचित सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

5 व 6 जानेवारी रोजी चिखली येथील स्थानिक परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थानामध्ये लोकशाहीर वामनदादा कर्डक नगरीत सावित्रीबाई फुले विचारपीठावर आयोजित लोककलावंतांच्या मेळाव्यात महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या परंतु समाजप्रबोधनामध्ये अग्रेसर असलेल्या लोककलांच्या अविष्काराचा भव्यदिव्य कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता.

त्यामध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नाळ चित्रपटातील अभिनेते अ‍ॅड.गणेश देशमुख यांचे अध्यक्षतेखाली तसेच जुन्या-नव्या अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणारे ज्येष्ठ सिनेकलावंत सचिन सावंत (उपअधिक्षक, उस्मानाबाद) यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखली येथील सुप्रसिद्ध भारूडकर्त्या कलावंत सौ.कविता लंके यांच्या भारूडाचा, हिवराआश्रम येथील सिनेअभिनेत्री रेणु महामुने हिच्या अप्रतिम नृत्याचा तसेच ग्रामीण भागातील तांबुळवाडी ता.लोणार येथील ग्रामीण बहुरूपी कलावंत उत्तमराव जाधव यांचा खेड्यातील सरपंच महिलेच्या वेशभुषेतील वक्तृत्वसंपन्न ग्रामपंचायत कारभारी पात्राचा मूर्तीमंत अभिनयाने यावेळी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यासोबतच कवयित्री सौ.ज्योती भवर यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमात वेगळीच रंगत भरली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या स्वागताध्यक्ष सुरेशआप्पा खबुतरे, अध्यक्ष डॉ.ऋषिकेश कांबळे तथा झेप संयोजन समितीच्या वतीने या लोककलावंतांचा पुष्पहार, मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र, रोख मानधन देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget