Breaking News

इंधन दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका


नवीदिल्लीः पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी रविवारीही वाढले. पेट्रोल आणि डिझेलमध्ये नव्या वर्षात झालेली ही मोठी दरवाढ आहे. ही दरवाढ करत तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 49 पैशांनी, तर डिझेलच्या दरात 59 पैसे प्रतिलिटरने दरवाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 48 पैसे आणि डिझेल 59 पैसे प्रतिलिटर दराने वाढले आहे. 

दिल्लीत पेट्रोल 69.75 रुपये, मुंबईत 75.39 रुपये प्रतिलिटर झाले, तर डिझेलचा दर मुंबईत 66.66 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली; पण आठवड्याच्या शेवटी ही दरवाढ थांबली आहे; मात्र या दरवाढीचा परिणाम भारतावर दिसून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उताराचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात लवकर कपातीची शक्यता कमी आहे, असे ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.