Breaking News

गणेशवाडीतील अपघातात पती ठार : पत्नी जखमी


सातारा (प्रतिनिधी ) : गणेशवाडी, (ता. सातारा) येथे आज दुपारी झालेल्या अपघातात डांगिस्टेवाडी येथील दुचाकीचालक पती जागीच ठार झाला असून त्याची पत्नीही जखमी झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ज्योतीराम आण्णा जाधव ( वय 37 , रा. डांगिस्टेवाडी, ता. पाटण) हे त्यांची पत्नी हेमा ज्योतीराम जाधव ( वय 30) यांच्यासमवेत खाजगी कामासाठी नागठाणे, (ता. सातारा) येथे आले होते. तेथील काम संपवून ते दुचाकीवरून पुन्हा गावी जात असताना गणेशवाडी येथील पोल्टी फार्मजवळ समोरुन आलेल्या अ‍ॅपे टेम्पोशी त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. 

या अपघातात ज्योतीराम आण्णा जाधव हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी हेमा जाधव या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.