Breaking News

शिवसंग्रामचे गणेश भोसले यांनी नववर्षानिमित्त केले दूध वाटपबुलडाणा,(प्रतिनिधी): नववर्षाला युवक मोठ्या प्रमाणात दारू पिऊन स्वागत करतात. या परंपरेला फाटा देत शिवसंग्रामचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले यांनी नववर्षाचे स्वागत धुदींत नव्हे तर शुद्धीत करा असा संदेश देत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुध वाटपाचा कार्यक्रम सैनिक मंगल कार्यालयाच्या बाजूला आज 31 डिसेंबर रोजी दूध वाटप करून नवर्षाचे स्वागत करण्यात आले.

सदा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गणेश भोसले यांनी मनोरूग्णांना मिठाई व फराळाचे वाटप करणे, गरीब विद्यार्थ्याना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करणे, रक्तदान शिबिर व मोफत रक्तगट शिबिर राबविणे, अपंग मुलींस दत्तक घेणे, सरकारी दवाखान्यात रूग्णांना फळ वाटप करणे यासह विविध सामाजिक उपक्रम त्यांनी गेल्या 7 ते 10 वर्षापासून राबविले आहे. गत दोन वर्षापासून नवयुवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्याच्या हेतुने यावर्षी त्यांनी दुध वाटप कार्यक्रम राबविला असून या उपक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, रणजितसिंग राजपूत, अजय बिल्लारी, चंद्रकांत बर्दे, अ‍ॅड. हरिदास उबरंकर, दिनेश मुडे, सुनिल तिजारे, युवराज वाघ, संजय जाधव, डॉ. राजेश्‍वर उबरहंडे, राजेश हेलगे, डॉ. सरकटे, डॉ. सचिन किणगे, डॉ. आशिष बारोटे, डॉ. संजय  गवळी, प्रा. प्रेम खासबागे, महेश पसपुलकर, योगेश शेवलकर, संदीप गायकवाड, संजय चव्हाण, नितेश थिगळे, संदीप सपकाळ, शशी बाहेकर, मुकुंद साखरे, ज्ञानेश्‍वर सुरपाटणे,  मंगेश राजपूत, प्रशांत हिवाळे, अमोल देशपांडे, अमृत पंडीत, राहुल राऊत, सुनिल सोनुने, नामदेव रिंढे, अ‍ॅड. राजेश खुर्दे, डॉ. तुषार पाटील, मधुकरराव जोगदंड, यासह पत्रकार, डॉक्टर, प्रतिष्ठत नागरिक यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. गणेश भोसले यांनी केलेल्या व्यसनमुक्तीपर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.