Breaking News

वेण्णागर शाळेत अवतरल्या सावित्रीबाई


सातारा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेण्णानगर, (ता. सातारा) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्वच विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून अनोख्या पध्दतीने सावित्रीबाईंना आदरांजली अर्पण केली. मुख्याध्यापिका सौ. वैशाली वीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात प्रारंभी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिक्षिका व विद्यार्थीनींनी ज्ञानज्योती सावित्रीबाईंच्या जीवनचरित्रावर आधारीत भाषणे सादर केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रणिता गायकवाड यांनी केले.