Breaking News

हृदयविकाराच्या झटक्याने विक्रम गडदे यांचे निधन


बीड (प्रतिनिधी):- परळी शहर ठाण्यात पोलीस कॉन्सटेबल म्हणून कार्यरत असलेल्या विक्रम नरहरी गडदे (वय ३८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी (दि.८) निधन झाले. परळी तालुक्यातील गडदेवाडी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विक्रम गडदे हे जम्मू काश्मिर येथे १२ वर्ष सैन्य दलात कार्यरत होते. त्यानंतर सन २०१२ मध्ये सेवानिवृत्त घेऊन ते पोलीस दलात भरती झाले. सुरुवातीस त्यांची मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी परळी येथील शहर ठाण्यात बदली करुन घेतली. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते ठाण्याकडे निघण्याच्या तयारीत असताना त्यांच्या छातीत त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधिकार्यांने सांगितले. त्यानंतर परळी तालुक्यातील गडदेवाडी येथे पोलीस प्रशासनाच्यावतीने मानवंदना देऊन शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.