अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासन करणार : चैनसुख संचेती
 देऊळगाव मही,(प्रतिनिधी): गरीब आणि गरजू रुग्णांना औषधोपचारासह आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी अटल आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणार्‍या सर्व गरजू रुग्णांना उपचाराचा शंभर टक्के खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन विदर्भ वैधानिक महामंडळचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी दिले.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता माँ जिजाऊ, संत चोखामेळा यांची जयंती तर भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त येथे अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन भाजपचे वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनील कांयदे यांच्यावतीने येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धुपतराव सावळे, माजी आमदार तोताराम कायंदे, डॉ. आशुतोष गुप्त, भगवान मुंढे, एकनाथ काकड, भगवान नागरे, डॉ. शिल्पा कायंदे, डॉ. वरकड, सिद्धिक कुरेशी, प्रवीण धनावत, डॉ. सुभाष शिंगणे, गुलाबराव शिंगणे भुतेकर यांची उपस्थिती होती.

 संचेती पुढे म्हणाले की, समाजातील गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचारासह आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सवलती मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. यंदा 34 कोटी 37 लाख रुपये खर्च करून गरजु रुग्णांना राज्य सरकारच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहावे व गरजू रुग्णांना शासनाच्या वतीने उपचारासाठी वेगवेगळ्या माध्यमातून उपचार करण्यात येत आहे. यासाठी शिबिर परिसरात ओपीडी मार्फत तपासणी करण्यात येणार असून विविध पॅथींच्या माध्यमातून रुग्णांची परिसरातील नामांकित डॉक्टरांमार्फत शिबिरात तपासणी झाल्यानंतर गरजेनुसार औषधोपचार करण्यात येणार आहेत.

रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात शिबिरात सहभागी होणार्‍या डॉक्टरकडे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, जनरल सर्जरी, बालरोग, मूत्ररोग, कान नाक घसा, स्त्रीरोग, कर्करोग, दंतरोग, जनरल मेडिसीन, क्षयरोग, लट्ठपणा, मानसिक आरोग्य, जेनेटिक विकार, रक्तदान शिबिर, आयुष आदी आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित म्हस्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे आणि माजी पंतप्रधान स्व अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील समाजसेवेचा वसा घेतला होता. तोच वसा कायम ठेवत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत डॉ. सुनील कायंदे त्यांचा संकल्प पुढे नेण्याचे काम करत असल्याचे आमदार संचेती यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget